मुंबई : मुंबई बॉम्बस्फोटातील फरार असलेला मुख्य आरोपी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपत्तीचा लिलाव काही दिवसांपूर्वी करण्यात आला. या लिलावात जायका हॉटेलसह गाडींचा लिलाव करण्यात आला. मात्र जायका हॉटेल वगळता इतर सर्व संपत्ती दाऊदची नसल्याचे स्पष्ट झालेय.
अधिक वाचा - दाऊदची गाडी त्यानं 'जाळण्यासाठी' घेतलीय विकत!
लिलावातील केवळ जायका हॉटेल दाऊदच्या मालकीचे होते. इतर सर्व संपत्ती तस्करीच्या कारवाईतून ताब्यात घेण्यात आली होती, असे वृत्त 'सकाळ'ने दिलेय.
अधिक वाचा - अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हॉटेलचा लिलाव
या लिलावात दाऊदच्या एका ह्युदांय कारचाही लिलाव झाला होता. हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी ही कार खरेदी केली होती. मात्र ही कारही दाऊदच्या मालकीची नसल्याची माहिती मिळाली आहे.