लिफ्टमध्ये अडकून दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू

लिफ्टमध्ये अडकून पडलेल्या एका दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नालासोपा-यात घडली. अली हैदर शेख असं या मुलाचं नाव आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 20, 2013, 11:54 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लिफ्टमध्ये अडकून पडलेल्या एका दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नालासोपा-यात घडली. अली हैदर शेख असं या मुलाचं नाव आहे.
साईधाम टॉवरमधील दुस-या मजल्यावरुन तळमजल्याकडे येत असताना अली हैदर लिफ्टमध्ये अडकला. दोन मजल्यांच्या मध्येच लिफ्ट अडकलीय. अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत त्याला बाहेर काढलं. मात्र दुर्देवानं त्याचा मृत्यू झाला. रहिवाशांनी लिफ्टच्या बिघाडाबाबत वारंवार सोसायटीकडे तक्रार केली होती.
नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोडवरील साईधाम टॉवर या सातमजली इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकून अली अडकला. तो इयत्ता सहावीत शिकत होता.
तळमजल्यावर अली लिफ्टमध्ये चढल्यावर लिफ्ट सुरू झाल्यानंतर वीज गेली. लिफ्ट थांबताच त्याने दरवाजा उघडला. त्याचवेळी जनरेटरवर लिफ्ट चालू झाली. त्यात अली लिफ्ट व भिंतीत अडकला. काही दिवसांपूर्वी या लिफ्टमध्ये एका मुलाला विजेचा धक्काही लागला होता, अशी माहितीही पुढे आली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.