अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली मुंबई पालिकेची उधळपट्टी

मुंबई महापालिकेच्या उधळपट्टीचं आणखी एक उदाहरण समोर आलंय. अभ्यास दौ-याच्या नावाखाली सर्व गटनेत्यांनी तुर्कस्तानची भ्रमंती केल्यानंतर इतर समितींच्या सदस्यांना देशांतर्गत दौ-यांची परवनागी देण्यात आली आहे.

Updated: Jan 15, 2015, 01:21 PM IST
अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली मुंबई पालिकेची उधळपट्टी   title=

मुंबई : मुंबई महापालिकेच्या उधळपट्टीचं आणखी एक उदाहरण समोर आलंय. अभ्यास दौ-याच्या नावाखाली सर्व गटनेत्यांनी तुर्कस्तानची भ्रमंती केल्यानंतर इतर समितींच्या सदस्यांना देशांतर्गत दौ-यांची परवनागी देण्यात आली आहे.

काल झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत उत्तराखंड, कर्नाटक, हैदराबाद इथल्या दौ-यांना मंजुरी देण्यात आली. आश्चर्य म्हणजे अवघ्या काही मिनिटांमध्ये या तथाकथित अभ्यास दौ-यांना मंजुरी मिळाली. 

आजवर झालेल्या अशा अभ्यास दौ-यांचा वापर नगरसेवक-अधिका-यांनी महापालिकेमध्ये केल्याचं ऐकिवात नाही. त्यामुळे या दौ-यांच्या नावाखाली महापालिकेच्या पैशांवर नगरसेवकांची पिकनिकच होत असल्याची टीका आता होतेय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.