आरटीओमधून एजंट्सना ४८ तासात हद्दपार करा - परिवहन आयुक्त

राज्यातल्या वाहनचालकांसाठी एक गुडन्यूज. आता 'आरटीओ' एजंटच्या विळख्यातून मुक्त होणार आहे. 'आरटीओमधून एजंट्सना हद्दपार करा असं फर्मान परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी सोडलंय.

Updated: Jan 15, 2015, 01:01 PM IST
आरटीओमधून एजंट्सना ४८ तासात हद्दपार करा - परिवहन आयुक्त  title=

मुंबई : राज्यातल्या वाहनचालकांसाठी एक गुडन्यूज. आता 'आरटीओ' एजंटच्या विळख्यातून मुक्त होणार आहे. 'आरटीओमधून एजंट्सना हद्दपार करा असं फर्मान परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी सोडलंय.

यासाठी त्यांनी आरटीओ अधिका-यांना ४८ तासांचं अल्टिमेटम दिलंय.. त्यानंतर आरटीओत एजंटचा वावर दिसल्यास कारवाईचा इशाराही झगडे यांनी दिलाय. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या इशाऱ्यानंतर अनेक ठिकाणी आरटीओ कार्यालयातून एजंट कमी झाले होते. परंतु त्यांचा कार्यालयाच्या बाहेर ३०० मीटरच्या आसपास धंदा सुरु होता. त्यामुळे परिवहन आयुक्तांच्या इशाऱ्यानंतर हा धंदाही बंद होण्याचे संकेत आहेत.

दरम्यान, भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाटी आरटीओ यंत्रणा बरखास्त करून नवी यंत्रणा उभारणार असल्याचे संकेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी पुण्यात बोलताना दिले होते.

आरटीओमध्ये लक्ष्मीदर्शनाशिवाय काम होत नसल्याचीही टीकाही यावेळी गडकरी यांनी केली होती. लवकरच देशातील आरटीओ तसेच वाहतूक पोलीस हे वाहतूक नियमनाच्या प्रक्रियेतून हद्दपार होणार आहेत. वाहतूक नियमन तसंच नियंत्रणाच्या नावाखाली होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यासंबंधीचा एक नवीन कायदा तयार करण्यात आला आला आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली होती. त्यानंतर महेश झगडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे एजंट हद्दपार होण्याची शक्यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.