मुंबई : महाराष्ट्र सरकारने दारुबंदी कायदा 2008 च्या नियमात बदल केला आहे. आता नव्या नियामानुसार एका महिन्यात आता फक्त २ बाटल्याच देशी दारु खरेदी करता येणार आहे. याआधी एक व्यक्ती १२ बाटल्या दारु विकत घेऊ शकत होता आणि जवळ बाळगू शकत होता. पण याचा ग्रामीण भागात गैरवापर होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. जास्त बाटल्या विकत घेऊन त्या गावात अवैधपणे विकल्या जात होत्या.
सरकारने ग्रामीण भागात सगळ्या दारुच्या दुकानांना गावाच्या बाहेर १०० मीटर जाण्यास सांगितलं आहे. म्हणजेच आता गावात दारुचं दुकान नसणार आहे. गावात महिला आणि लहान मुलांना याचा त्रास सहन करावा लागत होता. याचा लहान मुलांवर देखील परिणाम होत होता त्यामुळे दारुचं दुकान हे गावाबाहेर करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. त्यानंतर आता सरकारने आदेश दिले आहेत.