पेटीएमला टक्कर देण्यासाठी सरकारचे इ वॉलेट

पेटीएमसारख्या खासगी इ वॉलेटला टक्कर देण्यासाठी आता राज्य सरकारने पावलं उचलायला सुरूवात केलीय. 

Updated: Dec 6, 2016, 11:17 PM IST
 पेटीएमला टक्कर देण्यासाठी सरकारचे इ वॉलेट  title=

मुंबई : पेटीएमसारख्या खासगी इ वॉलेटला टक्कर देण्यासाठी आता राज्य सरकारने पावलं उचलायला सुरूवात केलीय. 

महा वॉलेट नावाने राज्य सरकार इ वॉलेट सुरू करणार आहे. अशी सेवा देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलंच राज्य असेल. 

विशेष म्हणजे यामधील पैशांची जबाबदारी सरकार घेणार आहे. सर्व प्रकारच्या कार्डाद्वारे यामध्ये पैशांचा व्यवहार करता येणार आहे. याबाबत सरकारतर्फे लवकरच घोषणा करण्यात येईल.