www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. विभागानुसार हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल ८३.४८ इतका लागला आहे. तर बारावी प्रमाणेच दहावीच्याही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल तब्बल ८४.९० टक्के लागला आहे. तर मुलांचा निकाल ८२.२४ टक्के इतका आहे.
विदयार्थ्यांना ऑनलाईन निकाल दुपारी एक नंतर हा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल. विद्यार्थ्यांना आपले विषयनिहाय गुण या संकेतस्थळावर पाहता येतील. तसेच त्याची प्रिंटआऊटही घेता येईल.
या निकालानंतर तब्बल आठ दिवसांनी म्हणजे १५ जूनला विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका शाळांमधून मिळतील. तर २५ जून ही पर्यंत गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे.
निकाल पाहण्यासाठी या वेबवसाईटवर लॉग इन करा
http://mahresult.nic.in
www.msbshse.ac.in
www.mh.hsc.ac.in
www.hscresult.mkcl.org
www.rediff.com/exams
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.