महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून शिवसेनेची सरकारवर टीका

महाराष्ट्र भूषण पुरस्कार बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर शरद पवारांनी नापसंती व्यक्त केली आणि एका नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं. याच वादात आता शिवसेनेनंही उडी घेतलीय. या मुद्द्यावर पवारांप्रमाणेच शिवसेनेनंही सरकारवरच टीका केलीय... पण, त्यांचं म्हणणं मात्र वेगळं आहे. 

Updated: Aug 18, 2015, 11:58 PM IST
महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून शिवसेनेची सरकारवर टीका title=

मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर शरद पवारांनी नापसंती व्यक्त केली आणि एका नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं. याच वादात आता शिवसेनेनंही उडी घेतलीय. या मुद्द्यावर पवारांप्रमाणेच शिवसेनेनंही सरकारवरच टीका केलीय... पण, त्यांचं म्हणणं मात्र वेगळं आहे. 

हा पुरस्कार बाबासाहेब पुरंदरे यांना देण्याला शिवसेनेनं आपलं समर्थनच व्यक्त केलंय. उलट हा पुरस्कार सोहळा छोटेखानी आयोजित केल्याबद्दल शिवसेनेनं नापसंती व्यक्त केलीय. हा सोहळा भव्य स्वरूपात शिवाजी पार्कवर किंवा शनिवार वाड्यावर आयोजित करायला हवा होता, असं सांगत सेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केलीय. 

बाळासाहेब ठाकरे किंवा आचार्य आज असते तर हा सोहळा आज शिवाजी पार्कवरच पार पडला असता... असं म्हणतानाच सरकारनं अशा दहा-पाच टाळक्यांसमोर शेपूट टाकू नये, असा सल्लाही त्यांनी दिलाय. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून बोलायला हवं, असंही त्यांनी म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.