राज ठाकरेंपाठोपाठ 'पानिपत'कारही बाबासाहेबांच्या पाठिशी

महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून वाद निर्माण झाल्यानंतर आता बाबासाहेब पुरंदरेंच्या समर्थनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठोपाठ पानिपतकार विश्वास पाटील मैदानात उतरले आहेत. 

Updated: Aug 18, 2015, 11:59 PM IST
राज ठाकरेंपाठोपाठ 'पानिपत'कारही बाबासाहेबांच्या पाठिशी title=

मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून वाद निर्माण झाल्यानंतर आता बाबासाहेब पुरंदरेंच्या समर्थनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठोपाठ पानिपतकार विश्वास पाटील मैदानात उतरले आहेत. 

साहित्यिक विश्वास पाटीलदेखील महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वादात उतरले आहेत. भालचंद्र नेमाडे हे साहित्यातले दहशतवादी असून शिवराय आणि संभाजींवर बोलण्याचं खुलं आव्हान त्यांनी नेमाडेंना दिलंय. तसंच बाबासाहेब  पुरंदरे ब्राम्हण असल्यामुळंच त्यांना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोपही विश्वास पाटलांनी केलाय. 

राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसह भाजपच्या नेत्यांना टार्गेट केलंय. बाबासाहेबांना हात लावाल तर याद राखा, महाराष्ट्रात तांडव करेन असा सज्जड इशारा राज यांनी पुरस्काराच्या विरोधात असलेल्यांना दिलाय. शरद पवार पुरस्कारावरून गलिच्छ राजकारण करत असल्याचा आरोप करत सरकारलाही टार्गेट केलंय. भाजपमध्येच छुपी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा आरोप त्यांनी लगावलाय. दरम्यान, महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून सुरू असलेला वाद हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कट रचला जात आहे असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी झी 24 तासला दिलेल्या एक्स्ल्युझिव्ह मुलाखतीत केलाय. भाजपचे काही मंत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये साटंलोटं असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केलाय. राज ठाकरे यांचा रोख विनोद तावडे यांच्यावरच आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.