अखंड महाराष्ट्राच्या मुद्यावर ठाकरेंची नवी खेळी?

विधानसभेत वेगळ्या विदर्भाच्या मागणीनंतर आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर शिवसेनेलाही आयती संधी मिळालीय. 

Updated: Aug 2, 2016, 02:16 PM IST
अखंड महाराष्ट्राच्या मुद्यावर ठाकरेंची नवी खेळी? title=

मुंबई : विधानसभेत वेगळ्या विदर्भाच्या मागणीनंतर आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर शिवसेनेलाही आयती संधी मिळालीय. 

अखंड महाराष्ट्राच्या मुद्यावर उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत फोनवर चर्चाही केलीय. काँग्रेसला सोबत घेऊन भाजपला कोंडीत पकडण्याची खेळी ही शिवसेनेची खेळी आहे का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालीय. 

उद्धव ठाकरेंनी दिवाकर रावते, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांच्यासोबत बैठक पार पडलीय. यानंतर शिवसेनेचे मंत्री थेट मातोश्रीवरून विधान भवनाकडे रवाना झालेत. सेनेचे हे नेते पृथ्वीराज चव्हाण यांची आमने-सामने भेटही घेणार आहे.

मुख्यमंत्र्यांची भूमिका... 

'वेगळा विदर्भ ही भाजपची पहिल्यापासूनची भूमिका पण, सरकारसमोर सध्या वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव नाही... मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे... जो विषय या सभागृहात झालेले नाही त्यावर चर्चा करणे योग्य नाही' अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्यांना फटकारलंय.