महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचला कन्हैया कुमार पण...

देशद्रोहाचा आरोप असलेला कन्हैया कुमार महाराष्ट्राच्या सभागृहाचं कामकाज पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचला होता. पण कन्हैया कुमारला तेथे प्रवेश नाकारल्याची माहिती आहे. आज प्रेक्षक गॅलरी बंद असल्याने त्याला प्रवेश नाकारल्याचं म्हटलं जातंय. पण आपण संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करुनच येथे आल्याचं कन्हैया कुमारचं म्हणणं आहे.

Updated: Aug 2, 2016, 01:55 PM IST
महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचला कन्हैया कुमार पण... title=

मुंबई : देशद्रोहाचा आरोप असलेला कन्हैया कुमार महाराष्ट्राच्या सभागृहाचं कामकाज पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचला होता. पण कन्हैया कुमारला तेथे प्रवेश नाकारल्याची माहिती आहे. आज प्रेक्षक गॅलरी बंद असल्याने त्याला प्रवेश नाकारल्याचं म्हटलं जातंय. पण आपण संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करुनच येथे आल्याचं कन्हैया कुमारचं म्हणणं आहे.

जेएनयू विद्यार्थी सेनेचा नेता कन्हैया कुमारने याआधी मोदींवर देखील टीका केली. 'अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत उमेदवार असलेले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रंप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक लोकांच्या विरोधात आहे. अमेरिकेत ट्रंप म्हणतात की, मुस्लिम आणि कृष्णवर्णीयांना देशातून बाहेर जाण्यास सांगतात तर भारतात मोदी नेतृत्व देखील मुस्लिम, दलित आणि इतर काही समुदायांच्या विरोधात बोलत असल्याचं कन्हैया कुमारने म्हटलं आहे.