मुंबई : मुंबईला सीईओ नेमण्याचा मुख्यमंत्र्यांचा विचार, महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. मात्र या प्रस्तावाला शिवसेनेनं जोरदार विरोध दर्शवलाय.
मुंबईच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी सीईओ अर्थातच मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्याचा विचार सध्या सत्ताधारी भाजपमध्ये सुरू आहे. या 'सीईओ'च्या नेमक्या जबाबदाऱ्या आणि मर्यादा काय असतील? याचा मात्र कोणताही आराखडा भाजपनं अद्याप जाहीर केलेला नाही.
त्याआधीच, हा प्रस्ताव धुडकावून लावत मुंबईला सीईओ नेमण्यास शिवसेनेनं विरोध व्यक्त केलाय. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा हा भाजपचा डाव असल्याचा आरोप शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केलाय.
तर, शिवसेनेची भूमिका ही मुंबई विकासाच्या विरोधात असल्याचं प्रत्यूत्तर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी देत या प्रस्तावाचं समर्थनच केलंय.
व्हिडिओ पाहा :-
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.