जैतापूर प्रकल्प : नरेंद्र मोदींना दिले उद्धव ठाकरे यांनी आव्हान

कोकणातील राजापूर येथील जैतापूर अणू ऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. जर तुम्हाला हा प्रकल्प हवा असेल तर तो थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला न्यावा, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले.

Updated: Mar 13, 2015, 07:22 PM IST
जैतापूर प्रकल्प : नरेंद्र मोदींना दिले उद्धव ठाकरे यांनी आव्हान title=

मुंबई : कोकणातील राजापूर येथील जैतापूर अणू ऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. जर तुम्हाला हा प्रकल्प हवा असेल तर तो थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला न्यावा, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले.

जैतापूर अणू ऊर्जा वीज प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम आहे. जैतापूर प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेला तर महाराष्ट्राला जेवढी विजेची गरज आहे, ती वीज महाराष्ट्र विकत घेईल. या प्रकल्पामुळे काही टक्के विकास होईल. मात्र, विकासासाठी 100 टक्के धोका महाराष्ट्राच्या माथी कशाला, असा प्रश्न उपस्थित करुन जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प नको, अशी भूमिका त्यांनी घेतली.

जर तुम्हाला हा प्रकल्प हवाच असेल तर तो गुजरातमध्ये हा प्रकल्प घेऊन जावा. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प गुजरातच्या मुख्यमंत्रनी त्यांच्याकड़े नेला तर बरे होईल, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव यांनी हाणला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.