मुंबई : रवी पुजारी गँगच्या गुंडांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तथा राजू पाटील यांच्या हत्येची सुपारी दिली होती. या प्रकरणी भांडुप येथील मंगतराम पेट्रोलपंपाजवळ मुंबई क्राईम ब्राचंने तीन आरोपींना अटक केली आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई क्राईम ब्रांचने शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांची हत्या करण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना अटक केली होती. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार ठाणे, कल्याण आणि डोंबिवली भागातील अनेक राजकीय नेत्यांच्या हत्येची सुपारी देण्यात आली आहे.
यापैकी काही प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. मात्र, अजूनही अनेक आरोपींना अटक करण्यासाठी मुंबई क्राईम ब्राचं शोध घेत आहे. संबंधीत राजकीय नेते आणि व्यावसायीकांना सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. दरम्यान, ठाण्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनाही ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळातून चिंता व्यक्त होत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.