भाजप शिवसेनेसोबत युती करणार नाही : सोमय्या

भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युती तोडण्याचा पुनरूच्चार केला आहे.

Updated: Oct 13, 2016, 08:48 PM IST
भाजप शिवसेनेसोबत युती करणार नाही : सोमय्या title=

मुंबई : भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युती तोडण्याचा पुनरूच्चार केला आहे.

शिवसेनेला टोला मारताना माफियांना साथ देणाऱ्यांसोबत युती करणार नसल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. शिवसैनिकांनी आपल्या हत्येचा कट आखला होता. सध्या अटकेत असलेल्या 14 शिवसैनिकांव्यतिरिक्त अजून सतरा आरोपींची नावं पोलिसांना देणार असल्याचं सोमय्यांनी सांगिले आहे.

सोमय्या यांच्या कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान सोमय्यांना धक्काबुक्की करणाऱ्या आणि भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी 14 आरोपी शिवसैनिकांना 27 ऑक्टोबरपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.