'शिवसेनेकडून माझ्या हत्येचा कट'

शिवसैनिकांनी माझ्या हत्येचा कट रचल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्यांनी केला आहे.

Updated: Oct 13, 2016, 07:10 PM IST
'शिवसेनेकडून माझ्या हत्येचा कट' title=

मुंबई : शिवसैनिकांनी माझ्या हत्येचा कट रचल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्यांनी केला आहे. सध्या अटकेत असलेल्या 14 शिवसैनिकांव्यतिरिक्त अजून सतरा आरोपींची नावं पोलिसांना देणार असल्याचं सोमय्यांनी सांगिलं आहे. माफियांना साथ देणाऱ्यांसोबत युती करणार नसल्याचंही किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

दरम्यान सोमय्यांना धक्काबुक्की करणा-या आणि भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी 14 आरोपी शिवसैनिकांना 27 ऑक्टोबरपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.