मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅशलेस मोहिमेचं शरद पवारांनी तोंडभरुन कौतुक केलं. कॅशलेसमुळे पारदर्शकता वाढली आणि खर्चाला आळा बसला असल्याचं निरीक्षणही पवारांनी केलं.
यशवंतराव चव्हाण यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार, नंदन निलकेणी यांना शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. देशात ग्रामीण तसंच शहरी भागातून विस्थापीत होणा-यांची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीत आधारकार्ड, डिजिटल विश्व बॅंक यांची भूमिका अत्यंत मोलाची असल्याचं सांगत, नंदन निलकेणी यांनी आधारकार्ड आणि डिजिटल बॅंकेचं महत्त्व यावेळी स्पष्ट केलं.