मुंबई : निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलंय. सुमारे ४००० डॉक्टरांनी आता संपाची हाक दिलीय. ते २ जुलैपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.
निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्या आहेत. त्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी मार्डने २ जुलैपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय. मार्डच्या मागण्या मान्य न झाल्याने मार्डचे डॉक्टर्स संपावर चालले आहेत.
निवासी डॉक्टर हे रूग्णालायाचा आत्मा आहेत. त्यांच्या आंदोलनामुळं रूग्णसेवेवर परिणाम होणार असल्यानं त्यांनी संपावर जावू नये, असं आवाहन जेजे रूग्णालयाचे डीन डॉ. तात्याराव लहाने यांनी केलंय. मार्डच्या विद्यावेतनासह महत्वाच्या मागण्यांसंदर्भात सरकार गांभीर्यानं विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, आज डॉक्टर्स डे तसा रोजच डॉक्टरांचा दिवस असतो. जन्मापासून मरणापर्यंतच्या विविध टप्प्यावर आपल्याला डॉक्टर भेटतो. कधी छोट्या मोठ्या आजारातून बाहेर काढणारा म्हणून तर कधी मरणाच्या दारातून परत आणणारा म्हणून. परंतु वाढत्या धंदेवाईकपणाच्या या काळात डॉक्टर आणि रूग्णांमधील नातंही आता पूर्वीसारख राहिलं नाही.
डॉक्टर सांगतील ती औषधं, चाचण्या, शस्त्रक्रिया करून घेतल्या जातात. त्यासाठी भरमसाठ पैसाही खर्च करतात. ते केवळ डॉक्टरच्या सांगण्यावरून... परंतु आपल्या आर्थिक लाभासाठी अशा अडलेल्या रुग्णांच्या भावनेचा गैरफायदा घेणा-या डॉक्टरांची वाढणारी संख्या चिंतेत टाकणारी आहे.
रूग्णसेवा कमी होतेय तर कट प्रँक्टीस वाढत जाताना दिसतंय. दुसरीकडे रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर होणारे हल्ले ही सुद्धा चिंतेची बाब आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.