मुंबई : मी एकाही रुपयाचा गैरव्यवहार केलेला नाही. जर माझ्यावरील आरोप सिद्ध झालेत तर मी मंत्रीपदाचा राजीनामा देईल, असा पुनरुच्चार महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
पंकजा यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळत आरोपांचे खंडन केले. मी कोणतेही काम नियबाह्य केलेले नाही. सन्मानिय सदस्यांनी केलेले आरोप हे चुकीचे आहेत. मी २०६ कोटी रुपयांच्या खरेदी प्रक्रियेची माहिती दडवण्याचा प्रयत्न केलेला नाही. उलट माझ्यावर आरोप करणाऱ्यांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित व्हायला हवेत, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
पत्रकार परिषदेतील मुद्दे
- आपल्यावरी आरोप सिद्ध असल्यास मी मंत्रीपदाचा राजीनामा देईन
- २०६ कोटी रुपयांच्या खरेदी प्रक्रियेची माहिती दडवण्याचा प्रयत्न केलेला नाही
- ताटासंदर्भात कंत्राट दिलेल्या कंपनीने आम्हाला अद्याप ताटांचा पुरवठा केलेला नाही, कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल
- दर करारात वितरक आणि उत्पादक या दोघांचाही समावेश होता
- माझ्यावर आरोप करणाऱ्यांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित व्हायला हवेत
- बाजारात १२ बाय १४ ची चटई २२०० रुपयांत मिळत असताना आम्ही याच मापाची चटई १४२० रुपयांमध्ये घेतली
- चिक्कीची प्रयोगशाळेत तपासणी झाली होती, अहमदाबाद आणि नाशिकमधील प्रयोगशाळेतून तपासणी करुन घेतली आहे
- संपूर्ण राज्यात एकच दरकरार असल्याने त्याच व्यक्तीला कंत्राट दिले आहे, काँग्रेसच्या काळातही याच व्यक्तीला कंत्राट दिले गेले आहे
- मुख्यमंत्र्यांनी दरकरासासाठीही ईटेंडरिंग करण्याचे आदेश एप्रिलमध्ये दिले होते, माझ्या खात्यातील खरेदी ही फेब्रुवारी व मार्चमध्ये झाली होती
- ज्या विभागात दर करार निश्चित आहेत त्यासाठी ई टेंडरिंगची गरज नसते, नवीन करारासाठी ई टेंडरिंग करावे लागते
- माझ्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे मी खंडन करते
- मी मंत्री होण्यापूर्वी महिला व बालकल्याण खात्यात ४०८ कोटींची खरेदी झाली, पण मी केलेली २०६ कोटी रुपयांची खरेदी हा घोटाळा म्हणणे अयोग्य
- मी खरेदीप्रक्रियेत कोणताही नियम धाब्यावर बसवलेला नाही
- माझ्या खात्याला मिळालेला पैसा वाया जाऊ नये म्हणून मी हा निर्णय घेतला
- मी कंत्राटात कोणालाही फायदा पोहोचवलेला नाही - पंकजा मुंडे
- २०११, २०१२ मध्येही महिला व बालकल्याण खात्यात अशा प्रकारची खरेदी झालेली आहे
- घोटाळा शब्द वापरुन खळबळ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला : पंकजा मुंडे
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.