राज यांना महाराष्ट्राची वाट लावायचेय - उद्धव ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना महाराष्ट्राची वाट लावायची आहे. पूर्वी ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांचे नाव वापरायचे. आता ते नरेंद्र मोदी यांचा मुखवटा घालत आहे. त्यांना त:च्या चेहऱ्यावर मतं मिळत नाही, म्हणून राज यांनी हा घाट घातला आहे, असा आरोप शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 15, 2014, 05:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना महाराष्ट्राची वाट लावायची आहे. पूर्वी ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांचे नाव वापरायचे. आता ते नरेंद्र मोदी यांचा मुखवटा घालत आहे. त्यांना त:च्या चेहऱ्यावर मतं मिळत नाही, म्हणून राज यांनी हा घाट घातला आहे, असा आरोप शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय.
उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर पुन्हा एकदा तोफ डागलीय. राज ठाकरेंना स्वत:च्या चेह-यावर मतं मिळत नाहीत म्हणून नरेंद्र मोदींचा मुखवटा हवा आहे, असा टोला उद्धव यांनी लगावलाय. पक्ष स्थापन केल्यानंतर त्यांनी सुरुवातीला बाळासाहेबांचा मुखवटा वापरला, बाळासाहेबांनी ताकीद दिल्यानंतर तो उतरावा लागला, याची आठवण उद्धव यांनी करुन दिली.
राहुल नार्वेकरांच्या प्रकरणी योग्य वेळी बोलेन असं उद्धव यांनी स्पष्ट केलंय. आपल्या वाक्याचा मीडियानं विपर्यास केला असा दावा त्यांनी केला. राहुल नार्वेकर प्रकरणात लवकरच व्यवस्थित खुलासा करेन. ज्याने बातमी दिली त्याने खुलासा करावा, मी बातमी दिली नव्हती, मला जेव्हा बोलायचे तेव्हा बोलेन, त्या पत्रकार परिषदेतही दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे ते सांगितले होते. मीडीयाने विपर्यास केलाय. त्याचा मी खुलासा मी का करावा ?, सवाल उद्धव यांनी केलाय.
तर मावळचे खासदार गजानन बाबर यांनी केलेले आरोपही उद्धव ठाकरे यांनी फेटाळलेत. मग मी सर्व उमेदवारांकडून पैसे घेतले का ? मी बाबर यांच्या भावना समजू शकतो. नगरसेवक, आमदार, खासदारकीचा बहुमान त्यांना दिला. काही वेळेला काही ठिकाणी उमेदवार बदलने आवश्यक असते. तो पक्षाचा आधिकार आसतो. मला दिले म्हणजे फुकट आणि दुसऱ्याला दिले म्हणजे विकत असा अर्थ कोणी काढू नये. त्यांचे गैरसमज लवकर दूर व्हावेत, असी अपेक्षा उद्धव यांनी यावेळी व्यक्त केली. बाबर यांना पक्षाने नगरसेवक, आमदार आणि खासदारही बनवले आता उमेदवारी न दिल्यानं ते आरोप करत आहेत, असं उद्धव यांनी म्हंटलंय.
तर नारायण राणे शिवसेनेचा प्रचार करणार का, असे सांगत राणेंच्या कोर्टात उद्धव ठाकरे यांनी चेंडू टाकलाय. शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले नारायण राणे शिवसेनेत चालतील का?, या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव यांनी हा प्रति प्रश्न केला. तसेच सेनेचे उमेदवार सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे उमेदवार विनायक राऊत यांचा प्रचार करणार का, त्यांना निवडून आणणार का? असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.