www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतील मलबार हिल भागाचं नाव बदलून रामनगरी करण्याच्या मनसे गटनेते दिलीप लांडेंच्या मागणीला खुद्द मनसे प्रमुख राज ठाकरेंनीच विरोध केला आहे. मलबार हिलचं नवं नामकरण करण्याची मागणी ही दिलीप लांडेंची वैयक्तिक मागणी असल्याचं राज ठाकरे म्हणाले. नवीन नाव द्यायचं असेल, तर त्यासाठी नवं काही तरी उभारा असा टोला राज ठाकरेंनी लगावलाय.
मलबार हिलचे नाव रामनगरी करा अशी मागणी मनसेनं महापालिकेकडे केली होती. मनसेचे महापालिका गटनेते दिलीप लांडे यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे मलबार हिलचे रामनगरी असे नामांतर करण्याची मागणी केली. मलबार हिल हे ब्रिटीश कालीन नाव असल्यानं त्यावर लांडेंनी आक्षेप घेतला होता. ‘रामनगरी’ हेच नाव योग्य असल्याचं पटवून देण्यासाठी लांडें यांनी पुराणाचे दाखलेदेखील दिले होते.
कुठल्याही पद्धतीच्या नामांतराला विरोध असल्याची भूमिका याआधी राज ठाकरेंनी मांडली होती. त्यामुळे त्यांच्याच पक्षाच्या गटनेत्यानं मलबार हिलचं नामांतर कऱण्याची सूचना केल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या. मात्र आपला नामांतराला विरोधच अस्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.