मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर विचित्र अपघात

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर पुन्हा एकदा एक विचित्र अपघात झालाय. पुण्याहुन डाळींब घेऊन येणाऱ्या एका ट्रकचे टायर फुटले. त्यानंतर एका मागून एक भरधाव वेगात येणाऱ्या 8 गाड्या एकमेकांना आदळल्या. 

Updated: Nov 4, 2015, 08:01 PM IST
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर विचित्र अपघात  title=

मुंबई : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर पुन्हा एकदा एक विचित्र अपघात झालाय. पुण्याहुन डाळींब घेऊन येणाऱ्या एका ट्रकचे टायर फुटले. त्यानंतर एका मागून एक भरधाव वेगात येणाऱ्या 8 गाड्या एकमेकांना आदळल्या. 

या अपघातात एकाचा बळी गेलाय तर 8 जण जखमी झालेत. या अपघातामुळे संपूर्ण रस्त्यावर डाळींबं सांडली होती... 

अपघातानं मुंबईकड़े येणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी एका सिमेंट ट्रकचा अपघात झाला होता. 

पाहा विचित्र अपघाताचा व्हिडिओ... 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.