मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात बेस्टची वीज वापरणाऱ्या ग्राहकांना या महिन्याचे वीज बिल दामदुप्पटीनं वाढल्याचं समोर आलंय. ऑक्टोबर महिन्यातील बिलाचे आकडे पाहून वीज ग्राहकांना शॉक बसलाय.
याआधी हजार ते दीड हजार बिल भरणाऱ्या ग्राहकांच्या हाती तीन ते चार हजार रुपयांची बिलं पडलीत. ही बिलं पाहून यांत काही तरी दोष असावा असा ग्राहकांचा समज होता. मात्र नवी वीज बिलं सदोष नसून वाढीव रक्कम अनेक घटकांचा परिणाम असल्याचं बेस्टनं स्पष्ट केलंय.
एमईआरसीच्या नियमानुसार बेस्टचे नवीन दरपत्रक एक एप्रिलपासून लागू करण्यात आले आहे. मात्र याआधी वीज बिलांमधील इ्ंधन समायोजन आकार आता वजा केला जात नसल्याने या वेळचे वीज बिल वाढल्याचं बेस्टनं म्हटलंय.
नव्या दरपत्रकानुसार हे दर १० ते २० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. यापुढील महिन्यांतही असेच २० ते ३० टक्के बिल जास्त येणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.