राज्यातील ४४ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक

राज्य पोलीस दलातील ४० अधिकार्‍यांना राष्ट्रपती पोलीस विशेष गुणवत्ता व पोलीस उल्लेखनीय सेवा पदक पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गृह मंत्रालयाकडून हे पुरस्कार जाहीर करण्यात आले होते.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 26, 2014, 04:09 PM IST

www.24taas.com झी मीडिया , मुबंई
राज्य पोलीस दलातील ४० अधिकार्‍यांना राष्ट्रपती पोलीस विशेष गुणवत्ता व पोलीस उल्लेखनीय सेवा पदक पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गृह मंत्रालयाकडून हे पुरस्कार जाहीर करण्यात आले होते.
पुरस्कार विजेत्यांमध्ये होमगार्डचे उपसमादेशक सुरेंद्रकुमार, मुंबईचे सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सदानंद दाते, औरंगाबादचे आयुक्त संजयकुमार, अति महत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षा विभागाचे महानिरीक्षक परमबीर सिंग, नांदेड परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक संदीप बिष्णोई, नक्षलविरोधी अभियानाचे विशेष महानिरीक्षक अनुपकुमार सिंग आदी वरिष्ठ अधिकार्‍यांचा समावेश आहे.
शौर्यपूर्ण सेवेबद्दल हवालदार सुखुजी परदेशी यांना मरणोत्तर तर उपायुक्त राजवर्धन यांना राष्ट्रपती पोलीस पदक बहाल करण्यात आले आहे. विजेत्यांमध्ये साहाय्यक आयुक्त सुनील देशमुख, विलेपार्ले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत तळेगावकर, विठ्ठल पवार यांच्यासह २०वर मुंबई व नवी मुंबईतील अधिकारी, कर्मचार्‍यांचा समावेश आहे.
लाचलुचपत विभागाचे उपायुक्त राजेश कुमार, जळगावचे यादवराव पाटील, बुलडाण्याचे साहाय्यक आयुक्त हरी मोरे, मुबई एसआयडी निरीक्षक प्रल्हाद खापुर्डे, व्ही.पी.रोड पोलीस ठाण्याचे श्रीकांत देसाई, मुंबई लाचलुचपत विभागाचे विनय कुलकर्णी, सीआयडी,मुंबईचे अशोक सुर्वे , पीटीएस, खंडाळ्याचे नंदकुमार पिनजान, एसआरपी हिंगोलीचे रमेश बहाले , एसआरपी अमरावतीचे बाबुराव चोपडे, नागपूर वायरलेसचे हरीराम कामाडी, नागपूर शहरचे महादेव गिरी, सोलापूर वाहतूक शाखेचे भास्कर थोरात, नंदुरबारचे राजेंद्र रायसिंगे, साहाय्यक फौजदार सर्वश्री केदार वर्तक, सूर्यकांत पवार (मुंबई), जलील अहमद काझी (पुणे शहर), रमाकांत मस्कर (वांद्रे पोलीस ठाणे), मुश्ताक अहमद शेख (जळगाव), सुरेश जाधव (मुंबई), नारायण पाटील (निर्मलनगर पोलीस ठाणे), राजाराम देशमुख (आरसीएफ पोलीस स्टेशन), सय्यद मुनीर (नाशिक शहर), किशोर सोनवणे (धुळे), अनंत पदाते (रायगड), प्रदीप देसाई, कृष्णा सावंत, निवाजी मदे, दत्तात्रय गायकवाड (चौघे पुणे), हंबीरराव शिंदे (एसआरपी दौंड), परमदत्त खंजोरो, मोरेश्‍वर माहूरकर (दोघे एसआरपी, नागपूर), हवालदार सर्वश्री गोविंद मेस्त्री (वायरलेस पुणे) , सदानंद बामणे (एटीएस, मुंबई) यांना पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.