मुंबई : राज्यातील ३८ अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ही घोषणा करण्यात आली आहे.
यामध्ये राज्य दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख विवेक फणसळकर, हिंगोलीचे उपनिरीक्षक अशोक जोंधळे यांना उल्लेखनीय सेवेसाठी तसेच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक जय जाधव यांच्यासह ३५ जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले.
यांचा गौरव होणार असून गुणवत्तापूर्ण सेवेसाठी मुंबई परिसरातील खालील जणांचा समावेश आहे. चंद्रकांत गुंडगे (पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, ठाणे ग्रामीण), मनोहर धनावडे (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई), शिवाजी घुगे (पोलीस उपनिरीक्षक, मंत्रालय सुरक्षा), विष्णू मालगावकर (वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, गुप्तवार्ता विभाग, मुंबई), रामचंद्र सावंत (पोलीस उपनिरीक्षक, वाहतूक शाखा, मुंबई), दीपक सावंत (वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, गुप्तवार्ता विभाग), बाबासाहेब गवळी (सहायक उपनिरीक्षक, अंधेरी), तानाजी लावंड (सहायक उपनिरीक्षक, सशस्त्र पोलीस, नायगाव), रवींद्र दळवी (हवालदार, मोटर वाहतूक विभाग, मुंबई), अनिल सालियन (हवालदार, सीआयडी, मुंबई), अरुण वास्के (हवालदार, अंधेरी पोलीस ठाणे), सदाशिव नाथे (हवालदार, विशेष शाखा, ठाणे), शांताराम डुंबरे (हवालदार, सशस्त्र पोलीस, नायगाव), तानाजी जाधव (हवालदार, वाहतूक शाखा, मुंबई), विजय महाडिक (हवालदार, गुन्हे शाखा, मुंबई).
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.