राधे माँला दोन आठवड्यांचा दिलासा

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू राधे माँला अंतरिम दिलासा मिळालाय. राधे माँनं अटकपूर्व जामीनासाठी केलेला अर्ज हायकोर्टानं मंजूर केलाय. राधे माँला हायकोर्टानं दोन आठवड्यांसाठी अंतरिम दिलासा दिलाय. त्यामुळं दोन आठवड्यांनंतर राधे माँवर अटकेची टांगली तलवार पुन्हा लटकणार आहे. 

Updated: Aug 15, 2015, 10:28 AM IST
राधे माँला दोन आठवड्यांचा दिलासा title=

मुंबई : स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू राधे माँला अंतरिम दिलासा मिळालाय. राधे माँनं अटकपूर्व जामीनासाठी केलेला अर्ज हायकोर्टानं मंजूर केलाय. राधे माँला हायकोर्टानं दोन आठवड्यांसाठी अंतरिम दिलासा दिलाय. त्यामुळं दोन आठवड्यांनंतर राधे माँवर अटकेची टांगली तलवार पुन्हा लटकणार आहे. 

सध्या मात्र राधे माँला पोलिसांच्या परवानगीशिवाय मुंबई सोडून जाता येणार नसल्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. तसंच चौकशी सुरु असेपर्यंत दर बुधवारी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत कांदिवली पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत. 

कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये राधे माँचा तब्बल तीन तास जबाब नोंदवण्याचं काम सुरू होते. हुंड्यासाठी सासरच्यांवर राधे माँनं दबाव टाकल्याची तक्रार निकी गुप्ता यांनी केलीये. राधे माँच्या सांगण्य़ावरुनच पती शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचं निकीनं या तक्रारीत म्हटलंय. या प्रकरणी राधे माँसह ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.