मुंबई : (02.00 PM दुपारी) नारायण राणे यांच्या राजीनाम्याविषयी आपण सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
1.05 वाजता
नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांकडे मंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द
12.45 वाजता
मुख्यमंत्र्याचं बोलावणं आल्यानंतर, नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर
12.15 वाजता
राजीनामा देऊन राज्याचा दौरा करणार, नारायण राणे यांनी मांडली भूमिका
11.25 वाजता
नारायण राणे यांचा शेवटचा सरकारी कार्यक्रम, वेबसाईट नारायण राणेंकडून लॉन्च
10.40 वाजता
नारायण राणेंना पक्षशिस्तीची माणिकरावांकडून आठवण
10.25 वाजता
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंकडून नारायण राणेंची मनधरणी
10 वाजता
नारायण राणेंबाबत काँग्रेसचं वेट एंड वॉच
O9 वाजता
नारायण राणे राजीनामा देणार का? देतील तर मंत्रिपदाचा? की, पक्षाचा? याच्या चर्चा
नारायण राणे यांच्यासारख्या नेत्याची काँग्रेसला गरज आहे. नारायण राणेंचा राजीनामा स्वीकारण्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी नकार दिला आहे.
मुंबई : नारायण राणे यांनी उद्योगमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. नारायण राणेंना मुख्यमंत्र्यांनी मनधरणीसाठी बोलावलं होतं. मात्र मुख्यमंत्री निवासस्थानीच नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांना आपला राजीनामा सोपवला आहे.
नारायण राणे यानंतर पत्रकार परिषदही घेणार आहेत. राजीनामा देऊ नका, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी नारायण राणे यांना केली असल्याचं सांगण्यात येत होतं.
नारायण राणेंची नाराजी घालवण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरु होते.. त्याला कितपत यश मिळतं हे ही आज स्पष्ट होईल. आजच्या पत्रकार परिषदेत नाराज नारायण राणे कुणावर हल्लाबोल करणार याकडे सर्वांचचं लक्ष लागलंय.
काँग्रेसमध्ये आल्यापासून मुख्यमंत्रीपदाची उघड मनिषा बाळगणारे नारायण राणे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. पक्षश्रेष्ठींवर राग नसल्याचं सांगणारे राणे यांचा राग मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर आहे.
आजच्या पत्रकार परिषदेत राणे त्यांचा विरोधात तोफ डागाणार हे निश्चित आहे. पण त्याच वेळी राणे काँग्रेसमधून बाहेर पडणार का अशीही चर्चा आहे. राणे यांनी पक्ष सोडू नये यासाठी कॉंग्रेच्या वरिष्ठ स्तरावर सुरु असलेल्या प्रयत्नांना यश येतं का हे आजच स्पष्ट होईल.
नारायण राणे यांच्यापुढे सध्या दोनच पर्याय आहेत. पहिला काँग्रेसमधे राहणे आणि दुसरा म्हणजे भाजपमध्ये जाणे. कारण शिवसेनेची दारे राणेंसाठी बंद आहेत. राणे यांची ताकद पूर्वी सारखी राहिली नाही. अनेक जण त्याना सोडून गेले आहेत, त्यामुळे ते वेगळा पक्षा स्थापन करतील अशी शक्यताही दिसत नाही.
नारायण राणे यांनी 2008 साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा विरोधात पत्रकार परिषद घेऊन उघड बंड पुकारले होते. त्यानंतर 2008 सालीच अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले तेंव्हाही राणे यांचा उद्रेक झाला होता. त्यांनी थेट काँग्रेस आणि पक्षश्रेष्ठींविरोधात टीका केली होती.
पक्षाने तेंव्हा राणे यांचा विरोधात निलंबनाची कारवाई केली होती. नंतर त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. नंतर राणे शांता झाले पण लोकसभा निवडणूक निकलानंतर राज्यात नेतृत्व बदल केला जाईल आणि आपल्याला मुख्यमंत्री पदाची संधी मिळेल असे राणे यांना वाटत होते. तसे न झाल्याने राणे यांनी पुन्हा एकदा बंडाचा झेंडा उगारला आहे. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये राणे काय निर्णय घेतात यावर पुढील राजकारणाची दिशा ठरणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.