मुंबई : मुंबई बॉम्ब स्फोटाचा दोषी याकूब मेमन याला फाशी दिल्यानंतर वाढलेल्या तणावात एका मुस्लिम व्यक्तीने एक अभिनव कल्पना मांडत खुल्या दिलाने मुंबईकडे मिठी मागितली आहे.
माझीम मिल्ला असे या मुस्लिम व्यक्तीचे नाव असून गिरगाव चौपाटी येथे तो गुरूवारी दुपारी डोळ्याला पट्टी लावून उभा होता. त्याने आपल्या शेजारी एक बोर्ड लिहिले होते. ' मी मुस्लिम आहे, माझा तुमच्यावर विश्वास आहे, तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर मला मिठी मारा...
मुंबईकडे विश्वासाची मिठी मागणाऱ्या माणसाला मिड डे च्या छायाचित्रकाराने या माणसाला शोधून काढले.
त्यानंतर अनेक जण या व्यक्तीला मिठी मारण्यासाठी पुढे सरसावले. या संदर्भात मिल्लाने सांगितले की, नागरिकांची प्रतिक्रिया काय आहे हे पाहण्यासाठी मी हा प्रयोग केला आहे.
यापूर्वी असा प्रयोग एका मुस्लिम व्यक्तीने कॅनडामध्ये केला होता. तो यशस्वी ठरला होता. या वर्षी फेब्रवारीमध्ये मुस्तफा मावला या व्यक्तीने डोळ्याला पट्टी बांधून बोर्ड लिहिला होता की, मी मुस्लिम आहे, मला दहशतवाद्याचे लेबल लावले आहे. माझा तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता का, मला एक मिठी द्या....
A Muslim man stood at Chowpatty (in Mumbai) on Thursday and asked for trust and hugs. Mumbai trusted and hugged. pic.twitter.com/9Rz96VNAV8
— Sachin Kalbag (@SachinKalbag) August 7, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.