मुंबईकरांच्या खिशावर ताण, मेट्रो भाडेवाढीला हिरवा कंदील

मुंबईतल्या मेट्रोच्या भाडेवाढीला सुप्रीम कोर्टानं हिरवा कंदील दिलाय. त्यामुळं राज्य सरकार आणि एमएमआरडीएला मोठा झटका बसलाय. 

Updated: Aug 8, 2015, 12:06 AM IST
मुंबईकरांच्या खिशावर ताण, मेट्रो भाडेवाढीला हिरवा कंदील title=

मुंबई : मुंबईतल्या मेट्रोच्या भाडेवाढीला सुप्रीम कोर्टानं हिरवा कंदील दिलाय. त्यामुळं राज्य सरकार आणि एमएमआरडीएला मोठा झटका बसलाय. 

भाडे नियंत्रण समितीनं मेट्रोचा ११० रुपयांपर्यंत दिलेला भाडेवाढीचा प्रस्ताव सुप्रीम कोर्टानं मान्य केल्यामुळं आता मेट्रोची भाडेवाढ १० रुपयांपासून ११० रुपयांपर्यंत होणार आहे. 

आता मेट्रोची भाडेवाढ निश्चित झाली असून मुंबईकरांचा मेट्रोचा प्रवास चांगलाच महागणार आहे. मेट्रोची नवी दरवाढ ही प्रवासी वर्गाच्या मुळावर असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. भाडेवाढीमुळे मेट्रोच्या प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे.

मेट्रोच्या तिकिटाचे दर वाढविण्यावरून रिलायन्स इन्फ्रा आणि एमएमआरडीएमध्ये वाद झाला होता. अखेर एमएमआरडीएने मुंबई उच्च न्यायालयात दरवाढीविरोधात आव्हान दिले होते. परंतु न्यायालयाने एमएमआरडीएची याचिका फेटाळून लावल्याने रिलायन्सने गतवर्षी जुलैमध्ये तिकिटाचे दर वाढविले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.