बॉलिवूड स्टार आणि अंडरवर्ल्ड डॉन शेजारी दफन करण्यात आले याकूबला

मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटातील दोषी याकूब मेमन याचा काल मुंबईच्या मरिन लाइन्स भागातील ७.५ एकरच्या बड़ा कब्रीस्तानमध्ये दफनविधी झाला. बडा कब्रिस्तान हे भारतातील सर्वात मोठ्या मुस्लिम दफनविधी करणाऱ्या ठिकाणांपैकी एक आहे. 

Updated: Jul 31, 2015, 02:35 PM IST
बॉलिवूड स्टार आणि अंडरवर्ल्ड डॉन शेजारी दफन करण्यात आले याकूबला title=
याकूबला मुंबईतील बडा कब्रिस्तानमध्ये दफन करण्यात आले.

मुंबई : मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटातील दोषी याकूब मेमन याचा काल मुंबईच्या मरिन लाइन्स भागातील ७.५ एकरच्या बड़ा कब्रीस्तानमध्ये दफनविधी झाला. बडा कब्रिस्तान हे भारतातील सर्वात मोठ्या मुस्लिम दफनविधी करणाऱ्या ठिकाणांपैकी एक आहे. 

याच ठिकाणी काही बॉलिवूडच्या कलाकारांनाही मूठमाती देण्यात आली आहे. त्यात सुरैया, नर्गीस दत्त, महेबूब खान आणि भारताच्या पहिल्या महिला म्युझिक डायरेक्टर आणि नर्गीस यांची आई जद्दनबाई यांचाही समावेश आहे. 

तसेच या ठिकाणी अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला आणि हाजी मस्तान यांचाही दफनविधी झाला आहे. पण बडा कब्रिस्तान ज्या जामा मशिद ट्रस्टकडून चालवले जाते, त्यांनी २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल आमीर कसाब याला आणि त्यांच्या साथीदारांना या कब्रीस्तानमध्ये दफन करण्यास विरोध केला होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.