www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शेअर बाजारात असलेली तेजी कायम आहे. आज मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकानं 23 हजारांचा टप्पा पार केला. मात्र काही वेळातच त्यात थोडी घसरण झाली आणि 22994 अंशांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 6859 अंशांच्या नव्या उच्चांकावर बंद झाला. आज सेन्सेक्समध्ये तब्बल 650 अंशांची वाढ झालीये. मोदी पंतप्रधान होण्याची आणि देशात स्थीर सरकार येण्याची शक्यता असल्यामुळेच बाजारात तेजीची लाट असल्याचं शेअर बाजार तज्ज्ञांचं मत आहे.
पाहा व्हिडिओ
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.