मुंबई : गणेशोत्वादरम्यान उसळलेल्या गर्दीत मुलींची छेड काढणाऱ्या तरुण मुलांना आणि तरुणांना मुंबई पोलीस वेगळ्या पद्धतीनं शिक्षा देताना दिसतायत.
गर्दीचा फायदा मुलींची स्त्रियांची छेड काढणाऱ्यांना पकडून जेलमध्ये टाकण्याऐवजी मुंबई पोलीस अशा तरुणांना त्यांच्या आई-वडिलांसमोर किंवा शाळा-कॉलेजमधील शिक्षकांसमोर त्यांचं ‘कर्तृत्व’ आणत आहेत.
गणेशोत्वादरम्यान छेडछाड रोखण्यासाठी पोलिसांनी व्हिडिओ रेकॉर्डिंगचीही मदत घेतलीय. अनेक ठिकाणी पोलीस याचसाठी तैनात करण्यात आलेत. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत. याच आधारे जवळपास 450 तरुणांना पोलिसांनी छेडछाड करताना रंगेहात पकडलंय.
हेच व्हिडिओ या तरुणांच्या पालकांना दाखवून पोलीस त्यांच्या मुलांचं कर्तृत्व त्यांच्यासमोर आणत आहेत. यामुळे, या तरुणांच्या पालकांनाही लाजिरवाण्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतंय. शिक्षकही अशा तरुणांची चांगलीच ‘शाळा’ घेत आहेत.
पोलिसांनी अशा मुलांचा एक रेकॉर्ड तयार केलाय. यामध्ये त्यांची नाव आणि फोटो पोलिसांकडे आहेत. त्यामुळे भविष्यात त्यांनी हा प्रकार पुन्हा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून मुलींवर अश्लील कमेट करण्याच्या आणि छेडछाडीच्या घटनांत वाढ होताना दिसतेय, त्यामुळे पोलीस कमिशनर राकेश मारिया यांनीच ही युक्ती सुचवलीय... आणि त्याचा चांगला प्रतिसादही पाहायला मिळतोय. अशा प्रकारचं ऑपरेशन सणासुदीच्या दिवसांत चालविण्याचं आता पोलिसांनी ठरवलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.