कचऱ्यातून दरमहा १५ ते २० हजारांची कमाई

कचरा हा शब्द उच्चारला तरीही आपण नाक मुरडतो..  मात्र आपल्याला जो कचरा वाटतो त्यामधून एखाद्या गरीबाचं आयुष्य सुखी होत असेल तर... आश्चर्य वाटलं ना...

Updated: Dec 3, 2015, 04:47 PM IST

कविता शर्मा, झी मीडिया, मुंबई : कचरा हा शब्द उच्चारला तरीही आपण नाक मुरडतो..  मात्र आपल्याला जो कचरा वाटतो त्यामधून एखाद्या गरीबाचं आयुष्य सुखी होत असेल तर... आश्चर्य वाटलं ना... मुंबईतला अत्यंत पॉश एरिया असलेल्या जुहूमधल्या कच-यानं गरीबांची आयुष्याची दशा आणि दिशा बदलली आहे.. पाहुया एक रिपोर्ट..

लक्ष्मी ..मुंबईत रस्त्यांवरून आणि घरांतून कचरा वेचण्याचं काम करते.. लक्ष्मी यापूर्वी घरोघरी पडेल ते काम करणारी लक्ष्मी कधी रस्त्यावर भीकही मागायची...  मात्र आता कचरा वेचून लक्ष्मी दर महिन्याला 15 ते 20 हजार रुपये कमावतेय... लक्ष्मीसारख्या जवळपास 250 लोकांना हा कचरा वरदान ठरतोय. ही किमया साधली आहे जुहूमधल्या डिसेंट्रलाईज्ड गार्बेज सेंटरनं... 

12 वर्षांपूर्वी म्हणजे 2002 मध्ये रागिणी जैन यांनी महापालिकेकडून 500 स्केवर फूट जमीन भाड्यानं घेतली. अशा प्रकारे कच-यातून आयुष्य घडवण्याचा हा प्रकल्प सुरु झाला. 

कचरावेचक स्त्री-पुरुंषांना एकत्र करुन रस्त्याच्या स्वच्छतेविषयी आणि कच-याच्या योग्य विल्हेवाटीबाबत माहिती दिली जाते. 20-25 कामगारांपासून सुरू केलेल्या या प्रकल्पात आता 250 जण काम करत आहेत. 

आमच्यामध्ये कचरा जास्तीत जास्त कचरा गोळा करण्यासाठी स्पर्धा लागते.. जेवढा जास्त कचरा तेवढा जास्त इन्सेंटीव्ह... त्यामुळे दरमहा 15-20 हजार रुपये कमावता येऊ शकतात.

या कच-यामुळे गरीब कचरावेचकांचं आयुष्य सुधारलंच सोबत जुहू भागातले रस्तेही आणखी चकाचक झाले. नक्कीच महापालिका प्रशासनाला यामधून शिकण्यासारखं आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.