मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राजभवनात जाऊ राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेतलीय.
मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची चर्चा आहे. येत्या सोमवारपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्याआधी मंत्रिमंडळ विस्तार होणं अपेक्षित आहे. पण अद्याप त्याविषयी कुठलीही ठोस भूमिका समोर आलेली नाही. त्यामुळे आजच्या या भेटीला महत्व प्राप्त झालंय.
दरम्यान, लखन भैय्या एन्कॉउंटर केसमध्ये ११ संयशीत अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. त्या संदर्भातही भेट घेतल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.