मुंबई : महापालिकेतल्या विकास आराखड्यावरून जोरदार वाद रंगण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. मुंबई शहराचा विकास आराखडा हा शिवसेनेनं नाही तर प्रशासनाने केलाय. या विकास आराखड्यात सर्वसामान्यांच्या हिताचं काही नसेल तर हा आराखडा चुलीत घाला अशी संतप्त प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिलीय.
विकास आराखडा हा मराठीतच असायला हवा असं उद्धव यांनी म्हटलंय. मुंबईचा विकास आराखडा मुंबईकराच्या हिताचा नसेल तर केराच्या टोपलीत टाका, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे मुंबई पालिकेत शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद विकोपाला जाण्याचे संकेत आहे.
भूमी अधिग्रहन विधेयकावरून उद्धव ठाकरेंनी विरोधकाची भूमिका घेतली आहे. उद्धव यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मातोश्रीवर जाऊन चर्चा केली. मात्र, दोन दिवसानंतर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शेतकऱ्यांच्या विऱोधात असेल तर आमचा विरोध राहिल. यावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलविण्याची मागणी उद्धव यांनी केलेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.