मुंबई : मुंबईतल्या 48 रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करण्यात येणार असल्याचं रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी स्पष्ट केलंय.
प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा देता याव्यात यासाठी स्टेशनच्या संरचनेत बदल केला जात असल्याचं रेल्वेमंत्र्यांनी म्हटलंय. राज्य सरकारच्या मदतीनं हा उपक्रम हाती घेण्यात आलाय.
त्यासाठी राज्यसरकारकडून वाढीव एफएसआय मागण्यात येत असल्याचंही प्रभूंनी म्हटलंय. तिकडे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर येणारा वाहनांचा ताण बघता दोन्ही शहरांना जोडणाऱ्या रेल्वेमार्गावर तेजस नावाच्या ट्रेन्स सुरू करण्यात येणार आहेत.