मोनिकाच्या स्वप्नांना कृत्रिम हातांचं बळ!

मुंबईत रेल्वे अपघातात आपले हात गमावलेल्या मोनिकाच्या नव्या आयुष्याची सुरुवात होतेय... कृत्रिम हातांसोबत आता मोनिका पुढची वाटचाल करायला सज्ज झालीय.  

Updated: Jul 17, 2014, 03:05 PM IST
मोनिकाच्या स्वप्नांना कृत्रिम हातांचं बळ! title=
फाईल फोटो

मुंबई : मुंबईत रेल्वे अपघातात आपले हात गमावलेल्या मोनिकाच्या नव्या आयुष्याची सुरुवात होतेय... कृत्रिम हातांसोबत आता मोनिका पुढची वाटचाल करायला सज्ज झालीय.  

रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेवर गेल्या सहा महिन्यापासून उपचार सुरु होते. आज मोनिकाला डिस्चार्ज मिळालाय. कृत्रिम हात बसवल्यामुळे आता मोनिका लिहू शकते... टाईप  करु शकते... पाणी पिऊ शकते.

या कृत्रिम हाताच्या सहाय्याने मोनिका आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. या सहा महिन्याच्या संघर्षमय प्रवासात मोलाची साथ दिल्याबद्दल मोनिकाने ‘झी २४ तास’चे आभार मानलेत. 


Caption

मोनिका मोरेच्या अपघातानंतर खचलेल्या मोरे कुटूंबीयांना ‘झी २४ तास’नं आधार देऊन पुन्हा आपलं आयुष्य नव्यानं सुरू करण्यासाठी मदत उपलब्ध करून दिली. मोनिका आता नव्या आत्मविश्वासाने घरी परततेय. सहा महिन्यानंतर घरी परतणाऱ्या मोनिकाचे घरी स्वागत करायला तिचे आई वडिलही आतूर झालेत. 

काय घडलं होतं 11 जानेवारी रोजी....
घाटकोपर रेल्वे स्टेशनमध्ये लोकल ट्रेन पकडण्याच्या नादात अवघ्या 16 वर्षांच्या मोनिका मोरे या मुलीनं आपले दोन्ही हात गमावले होते. 11 जानेवारी रोजी हा अपघात घडला होता. कुर्ल्याच्या नेहरुनगर भागात राहणारी मोनिका 11 जानेवारीला दुपारी घाटकोपर रेल्वे स्टेशनमध्ये लोकल पकडताना हात घसरून खाली पडली होती. तिला सुरुवातीला राजावाडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं... त्यानंतर तिला केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिच्या हातातून मोठा रक्तस्राव झाला होता. केवळ दैव बलवत्तर म्हणून मोनिका वाचली होती.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.