बाळासाहेबांवरून शिवसेना-मनसे आमनेसामने

मुंबईतल्या महापौर बंगल्यात बाळासाहेबांचं स्मारक उभारण्यास विरोध करणा-या मनसेनं स्मारकासाठी निधीच्या तरतुदीवरून शिवसेनेला टार्गेट केलंय. 

Updated: Feb 3, 2016, 06:50 PM IST
बाळासाहेबांवरून शिवसेना-मनसे आमनेसामने  title=

मुंबई : मुंबईतल्या महापौर बंगल्यात बाळासाहेबांचं स्मारक उभारण्यास विरोध करणा-या मनसेनं स्मारकासाठी निधीच्या तरतुदीवरून शिवसेनेला टार्गेट केलंय. 

महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी निधीची तरतूद न करणं दुर्दैवी असल्याचा आरोप मनसेनं केलाय.  

मोदींच्या सर्व योजनांसाठी तरतुदी होत असतील तर बाळासाहेबांच्या स्मारकासाठी निधीची तरतूद व्हायला हवी होती अशी प्रतिक्रिया मनसे नगरसेवकांनी दिलीय. 

तर या पूर्वीच्या अर्थसंकल्पात बाळासाहेबांच्या स्मारकासाठी तरतूद करण्यात आली होती. त्यामुळं ती पुढच्या अर्थसंकल्पात वर्ग होत असते असा दावा शिवसेनेचे खासदार आणि नगरसेवक राहुल शेवाळे यांनी केलाय. तर निधीचा वापर न केल्यास तो रद्द होतो अशी माहिती महापालिकेतल्या तज्ज्ञांनी दिलीय. 

त्यामुळं आता या बाळासाहेबांच्या स्मारकाच्या निधीवरून वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.