म्हाडाची खुशखबर; आता मिळणार ३५६ फुटांचं घर!

सध्या म्हाडाच्या १६० फुटांच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना म्हाडानं खुशखबर दिलीय. वसाहतींच्या पुनर्विकासात सध्या १६० फुटांच्या घराच्या ऐवजी ३५६ फुटांचं घर मिळणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 3, 2013, 09:18 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सध्या म्हाडाच्या १६० फुटांच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना म्हाडानं खुशखबर दिलीय. वसाहतींच्या पुनर्विकासात सध्या १६० फुटांच्या घराच्या बदल्यात ३५६ फुटांचं घर मिळणार आहे. यामुळे एकत्र कुटुंब असलेल्या कुटुंबांना आणि मुंबईत मोठ्या घराची स्वप्नं पाहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळालाय.
म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाच्या धोरणात बदल करण्यात आले असून सरकारनेही या सुधारित धोरणाला हिरवा कंदील दाखवला. पुढच्या महिनाभरात म्हाडा वसाहतींच्या या सुधारित धोरणांची अंमलबजावणी सुरू होईल.
काय आहे म्हाडाचं सुधारित धोरण...
> नव्या धोरणानुसार रहिवाशांना सध्याच्या कार्पेट एरियात ३५ टक्के वाढ मिळेल.
> फंजीबल एफएसआयच्या रूपानेही कार्पेटमध्ये आणखी ३५ टक्के वाढ होईल. म्हणजेच एकूण ७० टक्के क्षेत्रफळ जास्त मिळणार आहे.
> त्यामुळे सध्या १६० चौ. फुटांच्या घरात राहणार्याढ रहिवाशाला ३५६ चौ. फुटांचे घर.

> २२५ चौ. फुटांच्या जागेत राहणार्याच गाळेधारकाला ३८२ चौ. फुटांचे घर.
> पुनर्विकासाचे सुधारित धोरण लागू झाल्यानंतर विक्रोळीच्या टागोरनगरसारखे रखडलेले ‘म्हाडा’चे अनेक पुनर्विकास प्रकल्प तातडीने मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झालीय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.