डॉक्टरांचा संप मागे

मार्डच्या डॉक्टरांनी उद्यापासून बेमुदत संप पुकारला होता. हा संप मागे घेण्यात आलाय. प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता.

Updated: Aug 8, 2014, 10:56 PM IST
डॉक्टरांचा संप मागे title=

मुंबई : मार्डच्या डॉक्टरांनी उद्यापासून बेमुदत संप पुकारला होता. हा संप मागे घेण्यात आलाय. प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता.

राज्यातले ४ हजार डॉक्टर्स संपावर जाणार आहेत. यात राज्यातल्या १४ सरकारी आणि मुंबईतल्या तीन महापालिका हॉस्पिटल्सचा समावेश होता. रात्री उशिरा वैद्यकीय मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मार्डने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आरोग्य यंत्रणा ठप्प होण्याचा धोका टळला आहे. 

मार्ड संघटना गेल्या दोन महिन्यांपासून राज्य सरकारकडे मागण्यांसंदर्भात पाठपुरावा करत होती. राज्य सरकारनं मार्डच्या डॉक्टरांची केवळ आश्वासनांवर बोळवण केल्यामुळं मार्डनं अखेर बेमुदत संप करण्याच निर्णय़ घेतला होता. मार्डचा गेल्या वर्षभरातला हा तिसरा संप आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.