मुंबई : मार्डच्या डॉक्टरांनी उद्यापासून बेमुदत संप पुकारलाय. प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात येणार आहे.
राज्यातले ४ हजार डॉक्टर्स संपावर जाणार आहेत. यात राज्यातल्या १४ सरकारी आणि मुंबईतल्या तीन महापालिका हॉस्पिटल्सचा समावेश आहे.
मार्ड संघटना गेल्या दोन महिन्यांपासून राज्य सरकारकडे मागण्यांसंदर्भात पाठपुरावा करत होती. राज्य सरकारनं मार्डच्या डॉक्टरांची केवळ आश्वासनांवर बोळवण केल्यामुळं मार्डनं अखेर बेमुदत संप करण्याच निर्णय़ घेतलाय.
मार्डचा गेल्या वर्षभरातला हा तिसरा संप आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.