मुंबई : शिवसेना-भाजप युती यांच्यातील २५ वर्षांचा संसार मोडला असताना १५ वर्षांची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी मोडली. त्यानंतर राज्यात राजकीय गणिते वेगळीच दिसून लागलीत. अनेक जण इकडून तिकडून उड्या मारताना दिसत आहे. आपली खूर्ची टिकविण्यासाठी जोरदार फिल्डींग लावताना उमेदवार दिसत आहे. त्यामुळे इनकमिंग-आऊटगोइंग अनेक पक्षांत दिसत आहेत.
> राजन तेली यांना सावंतवाडीहून भाजपची उमेदवारी मिळाली आहे. राष्ट्रवादीकडून तिकीट न मिळाल्याने तेली भाजपमध्ये दाखल झालेत.
> ठाण्यात शिवसेनेचे नेते अनंत तरे यांनी बंडखोरी केलीय. माजी आमदार असलेल्या तरेंनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. भाजपकडून अर्ज दाखल करून तरे एकनाथ शिंदेविरुद्ध उभे ठाकणार आहेत.
> स्वाभिमानी शेतकरी संघटनेला खिंडार पडलाय. राजू शेट्टींचे कट्टर समर्थक उल्हास पाटील शिवसेनेत दाखल झालेत. शिरोळमधून उल्हास पाटील यांना शिवसेनेनं उमेदवारी दिलीये.
> भाजपमध्ये आलेल्या विलास जगताप यांनी राष्ट्रवादीला राम राम केला.
> कोकणात रत्नागिरीतील राष्ट्रवादीचे राज्यमंत्री राहिलेले उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून शुक्रवारी शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित प्रवेश केला आणि रत्नागिरीची उमेदवारी मिळवली.
शिवसेना प्रवेश
उल्हास पाटील (शिरोळ - स्वाभिमानी शेतकरी संघटना, राजू शेट्टींचे कट्टर समर्थक)
उदय सामंत (राज्यमंत्री, राष्ट्रवादी)
संभाजी पवार (भाजप)
अजिंक्य पाटील ( काँग्रेसचे मंत्री सतेज पाटील यांचे बंधू)
कृष्णकुमार शुक्लव (काँग्रेस)
अशोक मिश्रा (काँग्रेस)
सुदर्शन निमकर (राष्ट्रवादी)
पृथ्वीराज पवार (भाजप)
मनसे प्रवेश
डॉ. शुभा राऊळ (शिवसेना)
सुरेश साळोखे (शिवसेना)
भाजप प्रवेश
अनंत तरे (ठाणे - शिवसेना)
राम कदम (मनसे)
डॉ. सुनील देशमुख (काँग्रेसचे माजी नेते)
अनिल बोंडे (अपक्ष आमदार)
संदीप धुर्वे (शक्यद-राष्ट्रवादी)
सुभाष वानखेडे (शिवसेना)
दिलीप कंदकुर्ते (काँग्रेस)
माणिकराव कोकाटे (काँग्रेस)
चंद्रकांत खाडे (शिवसेना)
प्रताप मेहेरोलिया (शिवसेना)
राजन तेली (आधी काँग्रेस, नंतर राष्ट्रवादी, आता - भाजप)
विलासराव जगताप (राष्ट्रवादी)
राष्ट्रवादी प्रवेश
बसवराज पाटील-नागराळकर (काँग्रेस)
प्रकाश शेंडगे (भाजप)
बाळासाहेब व्हनमोरे (काँग्रेस)
काशिनाथ मेंगाळ (शिवसेना)
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.