रेल्वे प्रवाशांना मिळणार लोकलचे पेपरलेस तिकीट

 रेल्वेच्या प्रवाशांसाठी आता एक गुड न्यूज आहे.. रेल्वेच्या प्रवाशांची आता लवकरच तिकीटांच्या लांबच लांब रांगांपासून मुक्ती होणार आहे. कारण दोन महिन्यांत रेल्वे प्रवाशांना लोकलचे पेपरलेस तिकीट उपलब्ध होणार आहे.

Updated: May 5, 2015, 11:45 AM IST
रेल्वे प्रवाशांना मिळणार लोकलचे पेपरलेस तिकीट title=

मुंबई : रेल्वेच्या प्रवाशांसाठी आता एक गुड न्यूज आहे.. रेल्वेच्या प्रवाशांची आता लवकरच तिकीटांच्या लांबच लांब रांगांपासून मुक्ती होणार आहे. कारण दोन महिन्यांत रेल्वे प्रवाशांना लोकलचे पेपरलेस तिकीट उपलब्ध होणार आहे.

यापूर्वीही रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वेनं मोबाईल तिकीट सेवा सुरु केलीये. मात्र या मोबाईल तिकीट सेवेत तिकीटाची प्रिंट घेणं बंधनकारक होतं. त्यामुळे या सेवेचा प्रवाशांना फारसा फायदा होत नव्हता. यावर उपाय म्हणून चेन्नईमध्ये पूर्णपणे पेपरलेस तिकीट प्रणालीची चाचणी सुरु झालीये. या चाचणीला यश मिळत असून येत्या दोन महिन्यांत मुंबईलीत लोकल प्रवाशांना ही सुविधा पुरवण्यात येणार आहे.

पेपरलेस तिकीट प्रणालीचा दुरुपयोग रोखण्यासाठी रेल्वे बोर्डाने मोबाइल तिकिटांसाठी जीपीएसशी जोडण्यात येणार आहे. स्टेशन वा परिसरात प्रवेश करण्यापूर्वीच प्रवाशांना अॅप्सवरून मोबाइल तिकीट घेणे क्रमप्राप्त ठरणार आहे. मोबाइल तिकीट घेताना त्यांचे हस्तांतरण, तारीख, वार, वेळ आदींमध्ये गैरप्रकार होऊ नये याची विशेष काळजी घेण्यात आली आहे.

या प्रणालीत प्रामुख्याने छायाचित्र, पीडीएफ स्वरूपात येणारे तिकीट अहस्तांतरणीय राहणार आहे. या फाइल फॉरवर्ड करणे शक्य होणार नाही. ही प्रणाली जीपीएसशी जोडली गेल्याने अॅपमध्ये वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर प्रवासी स्टेशनच्या परिसराबाहेर जाताच ही फाइल नष्ट करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

या प्रणालीतून लोकल मार्गाचे मॅपिंग केले जाणार असून त्यातून तिकीट कोणत्या मार्ग, स्टेशनवरून कोणत्या स्टेशनवर जाणार हे पाहिले जाईल. मुंबईच्या उपनगरीय मार्गावर टप्प्याटप्प्याने मोबाइल तिकीट प्रणाली राबवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.