महापालिका निवडणुकीआधी भाजप-सेनेची फारकत?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी औरंगाबादमध्ये पत्रकारपरिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना एक भाकीत त्यांनी वर्तवल. सरकारमध्ये एकत्र सहभागी असूनही, परस्परांना जागा दाखवण्याची एकही संधी न सोडणारे शिवसेना-भाजपा मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी वेगळे होतील, अस, मत  शरद पवारांनी व्यक्त केलं आहे.

Updated: May 4, 2015, 07:29 PM IST
महापालिका निवडणुकीआधी भाजप-सेनेची फारकत? title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी औरंगाबादमध्ये पत्रकारपरिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना एक भाकीत त्यांनी वर्तवल. सरकारमध्ये एकत्र सहभागी असूनही, परस्परांना जागा दाखवण्याची एकही संधी न सोडणारे शिवसेना-भाजपा मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी वेगळे होतील, अस, मत  शरद पवारांनी व्यक्त केलं आहे.

 जितेंद्र आव्हाड यांची भूमिका व्यक्तीगत
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्काराने गौरवण्याला राष्ट्रवादी काँग्रेसचेच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विरोधाबद्दल बोलताना पवार म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांची भूमिका व्यक्तीगत असून, त्याच्याशी आपण सहमत नसल्याच त्यांनी स्पष्ट केलंय.

जेम्स लेनच्या पुस्तकाबद्दल बाबासाहेब पुरंदरे गप्प ? असा सवाल टि्वटरवरुन विचारत आव्हाड यांनी बाबासाहेबांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यावर आक्षेप घेतला होता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.