'परागच्या उपचारांचा हिंदुजाकडून कमर्शिअल वापर'

आज अकरा जुलै... हा दिवस म्हंटला की मुंबईकर रेल्वेप्रवाशांच्या अंगावर आजही काटा उभा राहतो. 

Updated: Jul 11, 2015, 12:35 PM IST
'परागच्या उपचारांचा हिंदुजाकडून कमर्शिअल वापर' title=
फाईल फोटो

मुंबई : आज अकरा जुलै... हा दिवस म्हंटला की मुंबईकर रेल्वेप्रवाशांच्या अंगावर आजही काटा उभा राहतो. 

याच दिवशी २००६ या वर्षी संध्याकाळी मुंबईतल्या रेल्वेगाड्यांमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाले होते. त्यात अनेक जण मृत्यू पावले होते. 

याच बॉम्बस्फोटात जखमी झालेल्यांपैंकी एक पराग सावंत यांचाही तब्बल नऊ वर्षांच्या चिवट झुंजीनंतर मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली देण्यासाठी मुंबईत विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आलं होतं. पाच दिवसांपूर्वी पराग़ने अखेरचा श्वास घेतला. मात्र या सगळ्या घटनेचा आणि पराग सावंतवरील उपचाराचा हिंदुजाने कमर्शियल वापर केला असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केलाय...शिवाय पोस्ट मोर्टमची गरज नसताना परागच्या मृतदेहाचं पोस्टमोर्टम करण्यात आलं... हिंदुजा हॉस्पिटलची मेडिकल कॉउंसिल कड़े तक्रार करणार असल्याचं सोमय्या यांनी सांगितलंय.. 

 माहीम रेल्वे स्थानकात भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या उपस्थितीत हल्ल्यातील मृतांनी श्रद्धांजली वाहण्यात आली. या घटनेला जबाबदार असणा-यांना लवकरात लवकर फाशी व्हावी अशी मागणी सोमय्या यांनी केलीय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.