विश्व साहित्य संमेलन अध्यक्षपदी शेषराव मोरे

अंदमानला होणाऱ्या विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक शेषराव मोरे यांची निवड झाली.

Updated: Jul 11, 2015, 12:06 AM IST
विश्व साहित्य संमेलन अध्यक्षपदी शेषराव मोरे title=

मुंबई : अंदमानला होणाऱ्या विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक शेषराव मोरे यांची निवड झाली.

ना. धों. महानोर यांनी या संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर या संमेलनाचं अध्यक्षपद कोणाकडे येणार, याकडे साहित्यविश्वाचं लक्ष लागलं होतं.

अखेर आज मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. तसंच संमेलनाच्या तारखांची घोषणाही करण्यात आली. ५ आणि ६ सप्टेंबरला पोर्ट ब्लेअरला हे अधिवेशन होईल. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य यांनी आज ही घोषणा केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.