इंदू मिलवर उभं राहणार बाबासाहेबांचं स्मारक!

इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झालाय. इंदू मिलच्या जमीन हस्तांतरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज (सोमवारी) अखेर मंजुरी दिलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 25, 2013, 11:20 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झालाय. इंदू मिलच्या जमीन हस्तांतरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज (सोमवारी) अखेर मंजुरी दिलीय.
संसदेच्या आगामी अधिवेशनात यासंदर्भात बिल मांडण्यात येणार आहे. अलिकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली इंदू मिल परिसरात आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावेळीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हा विषय केंद्रीय मंत्रिमंडळात मांडणार असल्याचं सूतोवाच कांबळे यांनी केलं होतं.
याचाच अर्थ आता स्मारकाचे श्रेय लाटण्यावरून राष्ट्रवादी आणि काँग्रेस या सत्ताधारी आघाडीमध्येच जुंपलेली दिसते.

व्हिडिओ पाहा -

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.