भारतीय बनावटीचे मेट्रोचे कोच ऑस्ट्रेलियाला निर्यात

भारतामध्ये बनवण्यात आलेले मेट्रोचे कोच ऑस्ट्रेलियाला निर्यात करण्यात आले आहेत.

Updated: Jan 29, 2016, 06:26 PM IST
भारतीय बनावटीचे मेट्रोचे कोच ऑस्ट्रेलियाला निर्यात title=

मुंबई: भारतामध्ये बनवण्यात आलेले मेट्रोचे कोच ऑस्ट्रेलियाला निर्यात करण्यात आले आहेत. मुंबईच्या पोर्ट ट्रस्टमधून हे कोच ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात आले आहेत. मेट्रोच्या या कोचचं काम बडोद्यामध्ये करण्यात आलं होतं.

 
ऑस्ट्रेलियानं मेट्रोसाठी 450 कोचची ऑर्डर भारताला दिली होती. त्यानंतर भारतानं पहिले सहा कोच ऑस्ट्रेलियाला पाठवले आहेत. ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात आलेला हा प्रत्येक कोच 75 फूट लांबीचा आणि 46 टन वजनाचा आहे.