ठेचून ठेचून आलं टाकूनही चहाला स्वाद येत नाही? 99% लोकांना चहाची योग्य पद्धत माहितच नाही

चहाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी आलं त्यामध्ये टाकलं जातं. चहामध्ये सर्व गोष्टी योग्य प्रमाणात टाकल्यास चहा उत्कृष्ठ होते. पण 99% लोकांना सर्वोत्कृष्ठ चहा बनवताच येत नाही. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 13, 2024, 06:55 PM IST
ठेचून ठेचून आलं टाकूनही चहाला स्वाद येत नाही? 99% लोकांना चहाची योग्य पद्धत माहितच नाही title=

Ginger Tea : हिवाळ्यात आल्याच्या चहा पिण्याची मजा काही वेगळीच असते. प्रत्येकाला एक कप आल्याचा चहा आवडतो. हा चहा सर्दी तर दूर करतोच पण आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. त्याची चवही अप्रतिम आहे. मात्र, आल्याचा चहा बनवण्याची योग्य पद्धत फार कमी लोकांना माहिती आहे. ठेचलेले आले घातल्यानंतरही अनेकदा चहाला चव येत नाही, अशी अनेकांची तक्रार आहे. अशा परिस्थितीत, योग्य चहाची सामुग्री आणि पद्धत जाणून घ्या. 

आल्याचा चहा बनवताना नेमकं काय चुकतं?

जेव्हा बहुतेक लोक आल्याचा चहा बनवायला जातात तेव्हा ते चहापत्तीसोबत आले घालतात. यामुळे चहाची चव वाढवत नाही. यासाठी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने चहामध्ये आले घालणे महत्त्वाचे आहे. चहापत्ती, दूध आणि साखर घालून उकळू द्या आणि नंतर आले घाला. यामुळे चहाची चव अप्रतिम होईल. आले ठेचून चहामध्ये घालू नये.

चहामध्ये ठेचलेले आले घालू नका

बरेच लोक चहामध्ये ठेचलेले आले घालतात, परंतु ही पद्धत योग्य नाही कारण आल्याचा रस ज्या भांड्यात ठेचला जातो त्या भांड्यातच राहतो. त्यामुळे चहाची चव सुधारत नाही. त्यामुळे चहा बनवल्यास त्यात ठेचलेले आले घालू नये. चहामध्ये आले मिसळण्यासाठी, ते किसून घेणे चांगले. त्यामुळे आल्याचा संपूर्ण रस चहामध्ये सहज विरघळतो आणि चहाची चव अतिशय सुंदर होते. 

आल्याचा चहा प्या, निरोगी रहा

1. आल्याचा चहा हिवाळ्यात आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे प्यायल्याने तुम्ही कमी आजारी पडाल.

2. आल्याचा चहा शरीरातील रक्ताभिसरण सुधारतो आणि हृदय निरोगी ठेवतो.

3. आल्याचा चहा वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

4. आल्याचा चहा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते.

5. आल्याचा चहा हिवाळ्यात शरीरातील वेदना आणि सूज यापासून आराम देतो.

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)