डोंबिवलीत वन विभागाने पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई केली आहे. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत वन विभागाने मोठी कारवाई केली असून प्रतिबंधित विदेशी वन्यजीव जप्त केले आहेत. पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी धाड टाकण्यासाठी डोबिंवलीमधील फ्लॅटमध्ये दाखल झाले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण घरात कासव, साप, अजगर, एग्वाणा (सरडा) यांच्यासह चिंपाझी माकडदेखील होतं. घराचा मालक फरार असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन विभागाला एका खबऱ्याच्या माध्यमातून ही माहिती मिळाली होती. ठाणे उपवनसंरक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हीकरवाई करण्यात आली
कल्याण वनक्षेत्राच्या अखत्यारितील नियतक्षेत्र पिसवलीमधील डोंबिवली येथील इमारतीत आठव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये वनविभाग व राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस व मानपाडा पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत या वन्यजीवांना ताब्यात घेण्यात आलं. कारवाई दरम्यान संबंधित आरोपी घटनास्थळी आढळून आला नाही. जप्त करण्यात आलेले वन्यजीव स्थानिक स्वयंसेवी संस्था बिरसा मुंडा, कल्याण यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात सुपूर्द करण्यात आले आहेत. या प्रकरणात पंचनामा व आवश्यक कागदपत्रे तयार करून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधून आलेल्या निनावी फोनमुळे ठाणे वन अधिकाऱ्यांना डोंबिवलीत तीन बेडरूमच्या फ्लॅटमध्ये बेकायदेशीररित्या प्राणी पाळलं जात असल्याचं समजलं. यावेळी पिंजऱ्यात बंदिस्त चिंपाझी माकड होता. हे माकड सहसा बोर्निओ आणि सुमात्रा च्या जंगलात आढळतात आणि एक लुप्त होत असललेली प्रजाती म्हणून सूचीबद्ध आहे.
A family took a flat on rent in Lodha Casa Bella Dombivli East
They were running illegal reptile smuggling.. raided after tip to Kalyan Forest dept...
Look at the snakes, turtles...
extinct chimpanzee in a cage too
Part 1 pic.twitter.com/wuvGnSN4NG
— Intrepid Mumbaikar।मुंबईचा वाटाड्या |बंबई का बाबू (@bhataktakavi) November 12, 2024
जेव्हा वन अधिकारी लोढा टाउनशिपमधील फ्लॅटवर पोहोचले तेव्हा त्यांना प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये 15 सरपटणारे प्राणी आढळले ज्यात अजगर आणि सरडा यांचा समावेश आहे, ज्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. वन अधिकाऱ्यांना एक स्टार कासव देखील सापडले आणि बेडरुमच्या आत एक मोठा पिंजरा होता ज्यामध्ये एक माकड होतं. फ्लॅटमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या मुलाने अधिकाऱ्यांसाठी दरवाजा उघडला. मालक सहा महिन्यांपूर्वी येथे राहायला आल्याचं त्याने सांगितलं.
जप्त केलेल्या प्राण्यांमध्ये उत्तर आणि मध्य आफ्रिकेत आढळणारे सहा बॉल अजगर, एक गोल्डन चाइल्ड रेटिक्युलेटेड अजगर जो जगातील सर्वात मोठ्या अजगरांपैकी एक आहे, एक सरडा, 6 कासव, एक भारतीय स्टार कासव जो धोक्यात आहे आणि एक माकड आढळलं.
“जप्त केलेले वन्यजीव तात्पुरते कल्याण येथील बिरसा मुंडा या स्थानिक स्वयंसेवी संस्थेकडे काळजी आणि देखरेखीसाठी सुपूर्द करण्यात आले आहेत. सविस्तर पंचनामा आणि इतर कागदपत्रे दाखल करण्यात आली आहेत आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे, ” असं वनविभागाच्या एका निवेदनात म्हटले आहे.
एका पंचतारांकित हॉटेलच्या कर्मचाऱ्याने आरोपींबाबत दिलेल्या माहितीच्या आधारे धाड टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. यानंतर दोन दिवस माग काढत पाळत ठेवण्यात आली. पण छापा टाकला तेव्हा तो पळून जाण्यात यशस्वी झाला. वनविभागाने गेल्या काही वर्षात केलेल्या मोठ्या कारवाईंपैकी ही एक आहे.